Nach Re Mora | नाच रे मोरा
Nach Re Mora | नाच रे मोरा
नाच रे मोरा ह्या पुस्तकाद्वारे गदिमांच्या ५० वर्षांतील लिहिलेल्या विविध गीतप्रकारांचा खजिनाच जणू आपल्याला भेट म्हणून "सौ. शीतल श्रीधर माडगूळकर" आणि " लीनता आलोक आंबेकर" ह्यांनी दिला आहे. यात 'चंदाराणी' 'शेपटीवाल्या प्राण्यांची' 'एक कोल्हा बहु भुकेला' चांदोबा चांदोबा भागलास का?' यांसारखी बालगीते किंवा 'जिंकू किंवा मरू' 'वंद्य वंदे मातरम्' सारखी स्फूर्तीगीते, तसेच 'निज माझ्या पाडसा' 'निज छकुल्या' यांसारखी अंगाई गीते आकर्षक चित्रांसहित भेट म्हणून दिली आहेत. बालपणाच्या आठवणी जागवणारा आणि छोट्यांना त्यांचा बालपणीचा काळ सुखाचा करून तो चिरकाल लक्षात राहील असा हा गीतसंग्रह लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना नक्कीच आवडेल.