Nachiketache Upakhyan | नचिकेताचे उपाख्यान

Nachiketache Upakhyan | नचिकेताचे उपाख्यान
औद्योगिक विश्वाच्या दणकट वास्तवाचं मायक्रोस्कोपिक अस्सल दर्शन घडवता घडवता जगण्याचे मूलभूत नियम तपासून पाहणारी आणि त्याचबरोबर एका भावूक कवीची यशस्वी मॅनेजरपर्यंतची वाटचाल दाखवणारे आरोह आणि आकांक्षेच्या अश्वापायी फरपटण्याचे अवरोह मांडणारी ताज्या दमाच्या लेखकाची ही कादंबरी.लेखक संजय जोशी स्वत: मोठ्या कंपनीत व्यवस्थापकपदावर असल्याने कंपनीविश्वाचं वास्तव अत्यंत प्रामाणिक अस्सलपणानं घेऊन येणारी कादंबरी. उपनिषदांचे संदर्भ नव्यानं तपासून पाहण्याचं आव्हान करून पॉझिटिव्हली गुड लिव्हिंगच्या चिरंतन शोधमार्गावरील पहिली कादंबरी ' नचिकेताचे उपाख्यान' रोखठोक वास्तव, प्रामाणिक भावुकता आणि जगायचं तत्त्वज्ञान या तीन अंगांनी विश्वाची आदळआपट मांडणाऱ्या झंझावाताची जबरदस्त सुरुवात ...