Nakarlela | नाकारलेला

Vilas Manohar | विलास मनोहर
Regular price Rs. 518.00
Sale price Rs. 518.00 Regular price Rs. 575.00
Unit price
Nakarlela ( नाकारलेला ) by Vilas Manohar ( विलास मनोहर )

Nakarlela | नाकारलेला

About The Book
Book Details
Book Reviews

महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींची स्थिती-मनःस्थिती कशी होती आणि सध्या कशी आहे? "विलास मनोहर यांनी त्यांच्या ‘एका नक्षलवाद्याचा जन्म’ या गाजलेल्या कादंबरीतून १९७५ ते १९९० दरम्यानच्या पंधरा वर्षांच्या काळातील या नक्षलप्रवण भागातील आदिवासींच्या स्थिती-मनःस्थितीचं जिवंत चित्रण केलं. त्या कादंबरीचा ‘सीक्वेल’ अर्थात पुढील भाग म्हणजे सदर कादंबरी ‘नाकारलेला’. या कादंबरीतून लेखकाने पुढे १९९० च्या दशकापासून तेथील परिस्थितीत आणि नव्या पिढीच्या आदिवासींमध्ये अनेक बदल कसे घडत गेले त्याचा वेध ‘आदिवासी-केंद्री’ दृष्टिकोनातून घेतला आहे. लेखक स्वतः दीर्घकाळ याच भागात वास्तव्यास असल्याने त्यांनी केलेलं समीप चित्रण विश्वासार्ह ठरतं." "एकीकडे शासनाची विकासाबाबतची बदलती धोरणं आणि दुसरीकडे नक्षलवाद्यांनी स्वीकारलेली लढाऊ नीती आणि या प्रक्रियेत सुरक्षादल व नक्षलवादी यांच्यामध्ये सापडलेल्या आणि सतत शकाग्रस्त भयग्रस्त वातावरणात जगणाऱ्या सामान्य आदिवासींच्या जीवनाचं प्रत्ययकारी चित्रण यात साधलेलं आहे. आज ग्रामसेवक शिक्षक प्राध्यापक पोलीस जवान म्हणूनही भूमिका बजावणारे आदिवासी; खबरे सावकार पत्रकार; राजकीय नेते व ‘नक्षल दला’चे नेते आणि मूळ इथलाच पण मोठ्या शहरात सुस्थित जीवन जगणारा आधुनिक नायक लालसू अशा अनेक व्यक्तिरेखांच्या नजरेतून वस्तुस्थितीचं ३६० अंशात दर्शन घडवू पाहणारी कादंबरी नाकारलेला"

ISBN: 978-9-39-237497-5
Author Name: Vilas Manohar | विलास मनोहर
Publisher: Rohan Prakashan | रोहन प्रकाशन
Translator: -
Binding: Paperback
Pages: 432
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products