Namdar Gokhalyancha Bharatsevak Samaj | नामदार गोखल्यांचा भारतसेवक समाज

Namdar Gokhalyancha Bharatsevak Samaj | नामदार गोखल्यांचा भारतसेवक समाज
स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या अनेक सेवाभावी, देशभक्त संस्थांमध्ये भारत सेवक समाजचे स्थान वैशिष्टपूर्ण आहे. नामदार गोपाळ कृष्ण गोखले यांनी १९०५ साली स्थापन केलेली ही संस्था संख्यात्मक अंगाने विचार केला तर कधीच खूप मोठी झाली नाही आणि तरीही ती दखलपात्र ठरली. कारण तिच्या सदस्यांनी केलेल्या कार्याची गुणवत्ता. स्वातंत्र्योत्तर काळात सरकारने याच नावाची दुसरी संस्था पुरस्कृत केल्यामुळे संस्थेने आपले नाव बदलले आणि हिंद सेवक समाज असे नवे नाव सरकार दरबारी नोंदवले. जनसामान्यांच्या मनात मात्र भारत सेवक समाज या जुन्या नावानेच ही संस्था आपला आब राखून आहे. अशा या संस्थेचा, तिच्या देशभक्त संस्थापकांचा, त्यांच्या कडव्या ध्येयवादाचा प्रेरक परिचय करून देणारे नरेन्द्र चपळगावकर लिखित पुस्तक.