Nanasaheb Peshwa : Ek Vilashan Kalkhand | नानासाहेब पेशवा : एक विलक्षण कालखंड

Nanasaheb Peshwa : Ek Vilashan Kalkhand | नानासाहेब पेशवा : एक विलक्षण कालखंड
एका असामान्य कालखंडाचा सचित्र वस्तुनिष्ठ वृत्तांत. अठराव्या शतकाच्या मध्यावर भारतात महत्वाचे बदल घडून आले. यात प्रामुख्याने मराठा सत्तेचा वायव्य सीमेपासून कर्नाटकापर्यंत तर गुजरात पासून बंगाल पर्यंत वर्चस्व निर्माण झाले. याच वेळी हिंदुस्तानात पाय रोवू पहाणाऱ्या युरोपियन सत्तांमधल्या चुरशीमुळे एक वेगळंच कथानक आकार घेत होतं. सुरूवातीला मुख्य प्रधान आणि नंतर जवळजवळ सत्ताधीश झालेल्या नानासाहेब पेशव्यानं आपल्या एकवीस वर्षाच्या कारकीर्दीत कौशल्यानं परिस्थिती हाताळून एक साम्राज्य उभारलं... "तत्कालीन प्रकाशित आणि अप्रकाशित मराठी पर्शियन इंग्लिश फ्रेंचआणि पोर्तुगीज दस्तावेजातून माहिती गोळा करून हिंदुस्तानचा आजपर्यंतचा इतिहास घडवणाऱ्या काळाचा हा लेखाजोखा आहे." इतिहासातल्या एका निर्णायक टप्प्याची ही लक्षवेधी कहाणी आहे.