Napas Mulanchi Goshta | नापास मुलांची गोष्ट

Napas Mulanchi Goshta | नापास मुलांची गोष्ट
मुलाला परिक्षेत कमी गुण मिळाले तर आई वडिल निराश होतात. मुलं आत्महत्या करतात. अनेकांचे मानसिक संतुलन बिघडते. राष्ट्रपिता महात्मा गांधी, आईनस्टाईन, जे. कृष्णमूर्ती, विस्टन चर्चिल, लोकमान्य टिळक इ. अनेक मोठी माणसे, चित्रकार, कलावंत, लेखक गणितात, इंगिलशम्ध्ये, चित्रकलेत नापास झालेली होती. आपल्या शालेय जीवनात, कॉलेजमध्ये निराशेचे ढग त्यांनी अनुभवले होते. पण ही माणसे निराश झाली नाहीत. त्यांनी आपापल्या क्षेत्रात आपल्या व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवला. समाजाला आनंद दिला. नापास झालेल्या मोठ्या माणसांच्या गोष्टी मनात रुजून कुठल्याही क्षेत्रात कधी तुम्हाला अपयश आले तर या मोठ्या माणसांचे चेहरे, विचार, कार्य तुम्हाला आठवतील. तुमचे उद्याचे भविष्य घडवण्यासाठी.