Narmade Har Har | नर्मदे हर हर

Narmade Har Har | नर्मदे हर हर
नर्मदा भारतातील एक प्राचीन नदी. तिची परिक्रमा म्हणजे नर्मदेला चालत प्रदक्षिणा घालण्याची परंपराही हजारो वर्षापूर्वीची. आज या परिक्रमेला भक्तीबरोबरच उत्कंठेचेही वलय लाभले आहे. श्रद्धापूर्वक परिक्रमा कशी करावी, याचे सविस्तर वर्णन जगन्नाथ कुंटे यांनी 'नर्मदे हर हर'मध्ये केले आहे. मध्यप्रदेश, गुजरात, महाराष्ट्राचा सीमा भाग असं विस्तीर्ण प्रदेश या परिक्रमेत येतो. सर्वाधिक परिक्रमा मध्य प्रदेशातून होते. "परिक्रमा करणाऱ्यांनी म्हणजेच परिक्रमावासीयांनी काही नियम पाळायचे असतात. ते काय आहेत शिवाय परिक्रमेत आलेले अनुभव अध्यात्मिक प्रचिती शूलपाणीच्या जंगलातून चालताना घडलेला प्रसंग साधू संत अन्य परिक्रमावासीयांचा परिचय सच्चेपणा प्रमाणिकपणा व ढोंगीपणा या वृत्तीचे दर्शन यातून घडते. तीन वेळा नर्मदामय्याच्या सान्निध्यात राहून साठवलेली अनुभवांची शिदोरी वाचताना परीक्रमेचे महत्व कळते तसेच वास्तवाचे भानही यातून येते." शतकानुशतके असंख्य माणसं नर्मदापरिक्रमा करीत आली आहेत. जगन्नाथ कुंटे हा असाच एक परिक्रमावासी.पण तो केवळ ’धार्मिक-आध्यत्मिक’ ओढीने निघालेला भाबडा भाविक नसून मोकळ्या मनानं अनुभूतीला सामोरं जाणारा शोधयात्री आहे. गेली अनेक वर्षं ते परिक्रमेमागून परिक्रमा करीत आहेत. एका झपाटलेल्या प्रवासाचं हे वर्णन.