Nashtya Maeyer Nashtya Gadhya | नष्ट मेयेर नष्ट गद्य

Nashtya Maeyer Nashtya Gadhya | नष्ट मेयेर नष्ट गद्य
या पुस्तकाचं नाव `नष्ट मेयेर नष्ट गद्य`. समाजाच्या दृष्टीनं मी `नष्ट` म्हणजे `वाया गेलेली` आहे. असं स्वत:ला म्हणवून घेणं मला आवडतं. कारण जी स्त्री स्वत:चं दु:ख, दैन्य, दुर्दशा दूर करायला बघते, धर्म, समाज आणि राष्ट्र यांच्यातील गलिच्छ नियमांना विरोध करायला खंबीरपणे उभी राहते, तिचा अपमान करणाऱ्या गोष्टींना विरोध करते, स्वतःच्या अधिकारांबद्दल जागरूक असते, तिला समाजातील सभ्य लोक `नष्ट` म्हणतात, हे सत्य आहे. स्त्रीला सुधारायचं असेल, तर पहिली अट तिनं `नष्ट` व्हायला पाहिजे. समाजाच्या दृष्टीनं `नष्ट` झाल्याशिवाय समाजाच्या कचाट्यातून स्त्रीची सुटका होणं शक्य नाही. लोक ज्या स्त्रीला `नष्ट` म्हणतात, तीच खरी निकोप आणि बुद्धिमान माणूस असते.