Nate Vanaspatinshi | नाते वनस्पतींशी
Nate Vanaspatinshi | नाते वनस्पतींशी
रोजच्या आहारात सामान्यपणे ज्या खाद्यपदार्थांचा समावेश केला जातो, त्यांचे स्वरूप, गुण, रस, वीर्य वगैरेंची माहिती आयुर्वेदिक ग्रंथांत दिलेली आढळते. चरकसंहितेत शूकवर्ग (धान्य), शमीवर्ग (कडधान्य), शाकवर्ग (भाज्या),फलवर्ग, गोरस वर्ग (दूध) वगैरे आहारवर्ग सांगितले आहेत. तसेच त्यांचे गुण-दोष, स्वभाव हेही वर्णन केलेले आहेत. एखाद्या वनस्पतीतील कोणते विशेष द्रव्य, एखाद्या मनुष्यावर कसे काम करू शकेल, एकूण मनुष्य जीवनाशी त्या वनस्पतीचा काय संबंध असू शकेल याची माहिती. आयुर्वेदाच्या अभ्यासकाला, वैद्यांना, सर्वसामान्य व्यक्तिलाही उपयुक्त ठरणारे पुस्तक.