Nathuramayan Ki Gandhi Sammohan ? | नथूरामायण की गांधी संमोहन?

Nathuramayan Ki Gandhi Sammohan ? | नथूरामायण की गांधी संमोहन?
आपापसात कोणतेही व्यक्तिगत वैर नसताना नथुराम गोडसे या एका सामान्य राजकीय कार्यकत्यनि महात्मा गांधींची हत्या केली. या विपरीत कृत्याचा वेध घेणारे मी नथुराम गोडसे 'बोलतोय' हे नाटक प्रदीप दळवी यांनी लिहिले, एका खलनायका' वर नाटक लिहिले जावे या घटनेने संतप्त होऊन मराठीतील अग्रगण्य इतिहाससंशोधक प्रा. य. दि. फडके यांचा सारासार विचार नष्ट होऊन त्यांनी इतिहास संशोधनाला बट्टा लावणारे 'नथुरामायण' हे चोपड़े प्रकाशित केले. मी हिंदुत्वादी नाही. इतिहासाचा विद्यार्थी असल्यामुळे मी फक्त बुद्धिवादी आहे. प्रस्तुत पुस्तक लिहिताना नथूरामायण मधील त्रुटी दाखविणक एवढाच मर्यादित हेतू नाही, तर यामागे इतर विद्वानांची जी भूमिका आहे ती चिंतीत करणारी वाटते त्यावर विचारवंतांनी मतप्रदर्शन करावे या अपेक्षेने सदर लेखन प्रपंच.