Naticharami | नातिचरामि

Naticharami | नातिचरामि
मीराच्या आत्मनिवेदनातून ही कादंबरी सरकते आहे. त्यामुळे अर्थातच मीराचे व्यक्तिमत्त्व हा या कादंबरीचा खरा गाभा आहे. मीराचे व्यक्तिमत्त्व ही व्यक्तिरेखा अतिशय प्रभावीपणे, अनेक कंगोर्यांसह आणि मुख्यत: तिच्या तीव्र बुद्धिमत्तेच्या क्षमतांसह कादंबरीत उजळून उभी राहते, हे या कादंबरीचे मोठे शक्तिस्थान आहे नि यशही. परंतु इथेच नोंदवायला हवे, की सामाजिक, सांस्कृतिक अशा संदर्भातील नियमांची समाजमान्य बंधनं झुगारणारी ही मीरा त्या नियमांच्या अर्थांचाही एकीकडे शोध घेतेच आहे.कथेपेक्षा कादंबरी साहित्यप्रकार हा फार मोठा आवाका असणारा प्रकार आहे. म्हणूनच या कादंबरीबद्दल उत्सुकता वाटणे स्वाभाविक नि साहजिक होते. 'नातिचरामि' कादंबरी तिच्या आशयापेक्षा तिच्या शैलीच्या सामर्थ्याने सर्वप्रथम लक्ष वेधून घेते.