Nek Namdar Gokhale | नेक नामदार गोखले

Nek Namdar Gokhale | नेक नामदार गोखले
लेखक व विचारवंत श्री. गोविंद तळवलकर हे एक व्यासंगी आणि चिकित्सक वाचक आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक विषयांबद्दल त्यांना अधिक आपुलकी असली तरी चांगले ललित साहित्य व काव्य यांचीही त्यांना आवड आहे. गोखले चरित्रग्रंथाचे नव्याने लेखन करताना त्यांनी अनेक देशी विदेशी ग्रंथांचे परिशीलन केल्याचे आढळून येईल. त्याचप्रमाणे भारत-इंग्लंडमधील तत्कालीन परिस्थिती, घटना व त्यांचे परिणाम, त्या काळातील प्रमुख व्यक्ती , नेते व राजकर्ते यांचे परस्परसंबंध व स्वभावविशेष, यांचेही डोळस निर्देश या ग्रंथात अनेक ठिकाणी दिसून येतील. आजवर अज्ञात असलेली बरीच माहिती वाचकांच्या ज्ञानात नव्याने भर घालेल. लेखकाने परिश्रमपूर्वक लिहिलेला हा चरित्रग्रंथ वाचकांना आवडून ते त्याचे स्वागत करतील.