Nirbachit Kabita | निर्बाचित कबिता

Nirbachit Kabita | निर्बाचित कबिता
कवयित्री म्हणून नावलौकिक मिळवू इच्छिणारी युवती ज्या वयात गुलाबी प्रेमाच्या किंवा दु:ख व्यक्त करणाया अत्यंत रोमँटिक अशा कविता लिहील, त्या वयात तसलिमा नासरिन स्त्रीपुरुषांच्या जीवनांतील असमानता, प्रेमाच्या नावावर होणारी प्रतारणा, निखळ प्रेमाच्या बदल्यात मिळणारी भोगलालसा, "आत्मसमर्पणाच्या बदल्यात वाट्याला येणारी अवहेलना अशांसारख्या विषयांवर कविता लिहिते.स्त्रीच्या वाट्याला येणारी फसवणूक आणि पुरुषांचे तिच्यावर असलेले वर्चस्व ह्यांसारख्या विषयांवर ह्याआधी काही कथा कविता लिहिल्या गेल्या असल्या तरी लेखिका तसलिमाप्रमाणे अगदी उघडपणे स्पष्टपणे कोणीही लिहिलेले नाही. स्वत:च्या शरीरावर झालेल्या अत्याचारांच्या कथा तिच्याइतक्या समर्पक शब्दांत कलात्मक भाषेत कोणीही मांडलेल्या नाहीत हेच तर आहे तिचे वेगळेपण."