Nirbachit Kalam | निर्बाचित कलाम

Nirbachit Kalam | निर्बाचित कलाम
लेखिकेने आपल्या बालपणापासून मनावर कोरल्या गेलेल्या आठवणी, कोणताही आडपडदा न ठेवता, लिहिल्या आहेत. ह्या आठवणी अतिशय कटू आहेत; पण त्या अतिशय प्रामाणिकपणे लिहिल्या आहेत, ह्यात शंका नाही. या पुस्तकात, पुरुषप्रधान समाजात स्त्रीला एक भोगवस्तू समजून कसे वागविले जाते, स्त्रीच्या पायात, धर्मशास्त्र सुद्धा, कशी बेडी अडकवू पाहते; एवढेच नाही, तर ईश्वरकल्पनेतही स्त्रीच्या छळाचे इंधन, अप्रत्यक्षपणे, कसे घातले गेले आहे, व्यवहारात प्रत्येक स्तरावर, प्रत्येक पतिपत्नी-संबंधांत – थोडक्यात संपूर्ण स्त्रीजीवनात – पुरुषांची लालसा, नीचपणा, हिंस्रपणा, अधिकार गाजविण्याची कृती, लबाडी आणि प्रत्येक गोष्टीत दखल देण्याची सवय कशी दिसून येते, ह्याविषयीची आपली मते लेखिकेने अगदी धीटपणे मांडली आहेत.