Nirmiti : Do Aankhe Barah Hath |निर्मिती : दो आँखे बारह हाथ

Nirmiti : Do Aankhe Barah Hath |निर्मिती : दो आँखे बारह हाथ
वेगळ्या पठडीतील चित्रपट काढणे हे अजूनही धाडसाचे काम समजले जाते. तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल की नाही, ही धास्ती हे त्यामधील एक प्रमुख कारण असे धाडस व्ही. शांताराम यांनी पन्नास वर्षांपूर्वी केले. सप्तरंगी 'झनक झनक पायल बाजे'ला भरभरून यश मिळाल्यानंतर चित्रपट काढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. नृत्य, निसर्गसौंदर्य, प्रेमकथा या गोष्टी टाळून तुरुंगाच्या दगडी भिंतीआड घडणारी कैदी व तुरुंग अधिकारी यांच्यातील कथा त्यांनी पडद्यावर आणली. १९५७ मध्ये प्रदर्शित झालेला या चित्रपट भारतातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर वाखाणला गेला. याच्या पटकथेपासून रुपेरी पडद्यावर झळकण्यापर्यंतची वाटचाल प्रभाकर पेंढारकर यांनी 'निर्मिती : दो आँखे बारह हाथ' मधून चितारली आहे. व्ही. शांतारामपासून सहाय्यक दिग्दर्शक केशवराव दाते, पटकथाकार ग. दि. माडगूळकर, गीतकार भरत व्यास, संगीतकार वसंत देसाई, पार्श्वगायक लता मंगेशकर, मन्ना डे, अभिनेत्री संध्या व अन्य संबंधितांची मेहनत, कष्ट यातून एक अभिजात चित्रपट कसा तयार झाला, याची ही कथा चित्रपटरसिक, अभ्यासकांचे मन निश्चितच भारून टाकणारी आहे.