Nothing Ventured | नथिंग व्हेंचर्ड

Nothing Ventured | नथिंग व्हेंचर्ड
ही डिटेक्टिव्ह कथा नसून एका डिटेक्टिव्हबद्दलची कथा आहे. विल्यम वॉरिक वडील सर ज्युलियन वॉरिक क्यूसी आणी बहीण ग्रेस यांच्यासारख बॅरिस्टर न बनता, लंडनच्या मेट्रोपोलिटन पोलीस फोर्समध्ये सामील व्हायच ठरवतो. विद्यापिठातुन पदवी घेतल्यानंतर विल्यमचा पहिला गुरू कॉन्स्टेबल फ्रेड येटसच्या दक्ष नजरेखाली त्याची पोलीसी कारकीर्द सुरू होते. त्यानंतर तो एक निवोदित तपास अधिकारी म्हणून स्कॉटलंड यार्डच्या कला आणि प्राचीन कलावस्तू दलात सामील होतो. या नोकरीदरम्यान आयुष्यात प्रथमच मोठ्या प्रकरणाची उकल करतो. फिट्झमोलियन म्यूझिअममधील रेमब्रॅंटच्या अमूल्य चित्राच्या चोरीच्या तपासावेळी तिथली संशोधन साहाय्यक बेथ रेन्सफोर्डशी त्याची भेट होते. तो तिच्या प्रेमात आकंठ बुडतो. बेथकडेदेखील एक गुपित असत आणि ते बाहेर पडेल या कल्पनेने ती घाबरलेली असते.