Oh My Godse | ओह माय गोडसे

Oh My Godse | ओह माय गोडसे
ही गांधी आणि गोडसे या दोन प्रवृत्तीमधल्या द्वंद्वावर भाष्य करणारी कादंबरी आहे. निव्वळ भाष्य नव्हे तर त्यांच्यातलं द्वंद्व कथेच्या रुपात उभं करणारी कादंबरी आहे. 'गांधी कभी मरते नही' असं आपण नेहमी म्हणतो. पण गांधी मरत नाहीत म्हणून नथुराम संपला, असं समजून कसं चालेल? या दोन्हीही प्रवृत्ती आणि यांच्यातलं द्वंद्व हे चिरंतन आहे, हे सूत्र सांगणारी ही कादंबरी आहे. गांधींभोवती त्यांच्या खुनानंतर जाणीवपूर्वक भलंमोठ गैरसमजाचं जाळं उभं केलं गेलेलं आहे. आणि ही गैरसमजांची जळमटं दूर करण्याचे काम ही कादंबरी नक्की करत असली तरी त्यातून फक्त गांधीच नव्हे तर 'नथुराम' ही प्रवृत्तीदेखील आपल्याला उलगडत जाते. 'ओह माय गोडसे' ही कथा प्रामुख्याने दोन मित्रांची, दोन विचारांची, दोन प्रवृत्तीमधल्या द्वंद्वाची आहे. गांधी-नथुराम पुन्हा भेटले तर...? आणि भेटले तर काय होईल? हा प्रश्न सातत्याने विचारी माणसाला पडतो. या कादंबरीत या प्रश्नांची उत्तरं लीलया सापडतील. ५५ कोटी, फाळणी, मुस्लीमअनुनय, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यलढ्यातील गांधींच नेमकं योगदान या आणि अशा अनेक बाबींवर प्रकाश टाकत पुढे जाणारी ही कादंबरी वाचकांना 'गांधींचा खून नेमका कशासाठी झाला?' या ऐतिहासिक सत्यापर्यंत आणून ठेवते.