Out Of The Box | आऊट ऑफ द बॉक्स

Out Of The Box | आऊट ऑफ द बॉक्स
क्रिकेट या खेळाकडे वेगळ्या दृष्टीने पाहण्याची सवय हर्ष भोगले यांनी लावली. किक्रेटचे समालोचन कसे करावे याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.खेळ चालू असताना, संपल्यावर व अन्य वेळी ते जे विश्लेषण करतात ते वाचून, ऐकून सामना न पाहिलेल्यांनाही तो प्रत्यक्ष पाहिल्याचा अनुभव येतो. आवाज, अचूक व चपखल शब्द, माहितीचे भांडार व महत्त्वाचे म्हणजे इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व यामुळे हर्ष भोगले हे नाव क्रिकेटशी संबंधित सर्वांनाच ओळखीचे आहे.त्यांच्या या अनुभवाचा प्रत्यय वाचकांना ‘आऊट ऑफ द बॉक्स’ या पुस्तकातून येतो. यात त्यांनी या खेळातील अनेक ‘आऊट ऑफ’गोष्टी सांगितल्या आहेत. कोणालाही न दुखवता, कोणावरही टीका न करता व कोणावरही राग धरता त्यांनी या खेळाबद्दल, खेळाडूंबद्दल अनुभवकथन केले आहे.