Pakistanchi Ghasaran | पाकिस्तानची घसरण

Pakistanchi Ghasaran | पाकिस्तानची घसरण
या देशाचं भवितव्य कसं आहे नेमकं? पाकिस्तानमधली न्यायव्यवस्था, शिक्षणव्यवस्था, अर्थकारण, राजकारण यांचे चेहरे कसे आहेत? सुधारणांना नकारच नोंदवणार्या या देशाची अधोगती अटळ असेल तर या देशाचा यापुढील इतिहास कसा आणि कोणत्या दिशेने आपली पावलं उमटवत जाणार आहे? पाकिस्तानबद्दलचे हे नि अशा अपरिहार्यही, गुतांगुतीचा प्रश्नांची विश्लेषक उकल करणारं हे पुस्तक ! शोधपत्रिकारितेच्या माध्यमातून निळू दामले यांनी यापूर्वी आपल्या अनेक पुस्तकांतून विविध देशाबद्दलची मतं, निरीक्षणं अभ्यासपूर्ण पध्द्तीने नोंदवली आहेत. पुरेशा तटस्थपणे मांडलेलं आणि अनेक ग्रंथाच्या वाचनातून आपल्या या भूमिकेला सिध्द्ता प्राप्त करून देणारं त्याचं आणखी हे एक सशक्त लेखन !