Palavarchi Manas | पालावरची माणसं
Palavarchi Manas | पालावरची माणसं
आलिशान टॉवरमधून सगळं शहर बघता येत, पण ऐश्वर्यापलीकडे कानाकोपऱ्यात दारिद्र्य पांघरून जगणारी वेदना बघण्याची दृष्टी येत नाही. पृथ्वीवर आज घडीला अशी सात अब्जांहून अधिक माणसं जगताहेत. पालावरची या लाखो माणसांकडे बघितल्यावर यांना माणूस तरी कस म्हणावं, असा प्रश्न पडतो. आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये 'पाल' म्हणून ओळखला जाणारा आडोसा उभारून जिवंत राहण्यासाठी तळमळणारे हे लोक. या आपल्यासारख्याच माणसंच अस्तित्व नाकारण्यात आपला प्रत्येकाचा वाट आहे. त्याच जिवंत राहणं खऱ्या जगण्यामध्ये परिवर्तित व्हावं, ही भवन उराशी बाळगून चितारलेला या सामाजिक शोकांतिकेची हा अक्षरालेख.