Pandhar | पांढर

Pandhar | पांढर
एक गाव. तीनशे-साडेतीनशे घरांचं. महामार्गाच्या आडवाटेला वसलेलं. मेघराजाच्या अवकृपेनं सतत तीन वर्षं दुष्काळात होरपळून निघालेलं. पाऊस नाही म्हणून शेती बुडालेली. विहिरी आटून गेलेल्या. पिण्याच्या पाण्यासाठी गावकर्यांची रानोमाळ भटकंती. शेती बुडाली म्हणून शेतकरी कर्जबाजारी झालेले. शिरावर कर्जाचं ओझं पेलवेसाआसं झालेलं म्हणून आत्महत्येसारखा पर्याय शोधणारे अल्पभूधारक. रोजगारासाठी गाव, गावातील राहती घरं सोडून तालुक्याच्या आश्रयानं स्थलांतरीत होणारी कुटुंबं. मृत्यूच्या अनेक रूपांनी एकचवेळ खचणारी आणि निबर होत जाणारी मनं. आणि ओसाड होऊ लागलेलं, अंगाखांद्यावर भकासपण घेऊन मागे उरलेलं गाव ... दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर निसर्ग आणि माणसाच्या सनातन संघर्षाची मन सुन्न करणारी कादंबरी.