Pandita Raybaghan | पंडिता रायबाघन

Pandita Raybaghan | पंडिता रायबाघन
सतराव्या शतकात मुघल काळ सुरू झाल्यावर नांदेड जिल्ह्यातील माहूर येथील रामगड किल्ल्यावरील औरंगझेब याचे एक मराठी सरदार उदारान देशमुख, यांची पत्नी सावित्रीबाई देशमुख, यांनी उदाराम यांच्या मृत्यूनंतर त्यांचे सरदारपद भूषविले. सावित्रीबाई देशमुख यांनी पतीचे सरदारपद हाती घेताच अनेक लढाया हातात तलवार आणि पाठीला भाला घेऊन गाजवल्या त्या पाहून सम्राट औरंगझेब ह्याने त्यांना स्त्री शार्दुल हा उंची किताब बहाल केला पण मुळात त्या किताबाचा उल्लेख रायबागन असा केला जातो त्याचा कवी परमानंद यांनी सांगितल्याप्रमाणे खरा अर्थ किंवा उल्लेख राजव्याघ्री असा आहे, परंतु सरळ मराठी बोलीत आणि हिंदी भाषेत रायबागन असा आजही वापरात आहे.