Papillon | पॅपिलॉन

Papillon | पॅपिलॉन
हेन्री शॅरीयर यांच्या गाजलेल्या कादंबरीचा हा अनुवाद रवींद्र गुर्जर यांनी केला आहे. आत्मविश्वास आणि धाडस, बळकट शरीराच्या जोरावर मनुष्य किती सामर्थ्य दाखवू शकतो, हे सांगणारी ही कादंबरी आहे. पॅपिलॉंन हे त्यांचं गुन्हेगारी जगतातील टोपण नाव त्यामुळे ही कादंबरी एक वेगळंच जग समोर आणते. पॅपिलॉन (अर्थात फ्रेंच मध्ये अर्थ फुलपाखरु असा आहे) ची गोष्ट एका सत्यघटनेवर आधारीत आहे. एक माणुस ज्याला त्याने न केलेल्या गुन्ह्याबद्दल जन्मठेपेची शिक्षा होते, तो तुरुंगातुन ९ वेळा पळुन जाण्याचा प्रयत्न करतो आणि शेवटी यशस्वी होतो त्याचे अंगावर काटा आणणारे वर्णन या पुस्तकात आहे. फ्रांस मधील तुरुंग, तेथील जुलम-जबरदस्ती, कैद्यांना मिळणारी अत्यंत हिणकस वागणुक आणि त्यांच्यावर होणारे अत्याचार चे जबरदस्त वर्णन. अपयश ही यशाची पहीली पायरी आहे असे म्हणतात. लेखक या पायर्या यशस्वी होण्यासाठी ९ वेळा चढतो. पुस्तक संपल्यावर, कुठलीही गोष्ट प्रयत्न केला तर अशक्य नाही हा एक धडा आपल्याला नक्कीच मिळतो.