Paratoni Pahe | परतोनि पाहे

Paratoni Pahe | परतोनि पाहे
परतोनि पाहे’ हा वीणा देव यांच्या व्यक्तिविषयक अनुभवांसंबंधीच्या एकवीस ललित लेखांचा संग्रह. संगीत, वाङ्मय, चित्र, नृत्य, काव्य, इतिहास, वैद्यक इत्यादी क्षेत्रांतील नामवंत व्यक्ती `परतोनि पाहे’मध्ये साकार होतात. "वडिलांमुळे – गो. नी.दाण्डेकर यांच्यामुळे – जडलेले तसेच स्वत:च्या आवडीमुळे ओढीमुळे जुळलेले आणि जमलेले अनेक जीवितधागे इथे शब्दांतून गुंफले जातात. वीणा देव यांना वाङ्मय संगीत नाट्य अभिनय आदींमध्ये उपजत जाण आणि गती आहे. समीक्षा ललित लेख अशा वाङ्मयप्रकारांत त्यांनी सातत्याने लेखन केले आहे. महत्त्वाच्या काही ग्रंथांचे संपादनही." "वडिलांच्या व्यक्तिमत्त्वाचे व्यापकपणे चित्रण करणारे `आशक़ मस्त फक़ीर’ आणि ललित लेखांचे `कधी कधी’ ही त्यांची त्यांतली स्वतंत्र निर्मिती असलेली वेधक पुस्तके. `आशक़ मस्त फक़ीर’ला महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार प्राप्त झाला. रूढ सांकेतिक स्वरूपाची ही व्यक्तिचित्रे नाहीत. विविध पातळ्यांवर लेखिकेला प्रतीत झालेल्या संबंधांचा हा हृद्य भावबंध आहे साध्या सरळ भावदर्शी शब्दकळेने उलगडणारा."