Pasang | पासंग

Pasang | पासंग
मराठी वाङ्मयसमीक्षेच्या क्षेत्रात कुसुमावती देशपांडे यांनी १९३३-६१ या काळात केलेले लेखन अत्यंत मोजके पण फार मोलाचे आहे. अभिजात व प्रगल्भ रसिकता, इंग्रजी मराठी वाङ्मयाचा चौफेर व्यासंग, पाश्चात्य व भारतीय वाङ्मयीन विचारांच्या परंपरांचे अखंड भान, चित्रकलादि ललितकलांची प्रत्यक्ष समज, हाती घेतलेल्या विषयाचा सूक्ष्म अभ्यास, वृत्तीतील मन:पूर्वकता, गाढ सामाजिकतेचे वैचारिक अधिष्ठान आणि प्रौढ-गंभीर भाषा -अशा विविध गुणांमुळे कुसुमावतींचा प्रत्येक टीकालेख महाराष्ट्रातील साहित्यविचाराला नेहमीच चालना देत आलेला आहे. ग्वाल्हेर येथे १९६१ साली कुसुमावतींच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणासह त्यांचे सर्व टीकालेखन 'पासंग'मध्ये संग्रहित केले आहे.