Pavasanantarch Un | पावसानंतरचं ऊन

Pavasanantarch Un | पावसानंतरचं ऊन
पावसानंतरचं ऊन'मधील कथा वाचतानाही त्यातील कवितापण खुणावत राहते. 'काव्य जागवणार्या लयबद्ध कथा' असेच या कथांचे वर्णन करता येईल. "संग्रहातील नऊ कथांचे विषय खूप वेगवेगळे तरीही आपल्या भवतीचे आहेत; पण या कथा त्या विषयांसाठी नसाव्यातच. त्या त्यातील माणसांसाठी त्यांच्या मनाच्या कंगोर्यांसाठी परस्परातील नात्यांसाठी अवतरतात. या सगळ्या कथांचे एकच सूत्र दाखवायचे तर ते संग्रहाच्या शीर्षककथेत दिसते. गॅलरीतून-खिडकीतून आत येणारे पावसानंतरचे ताजे ऊन आपल्या चित्तवृत्ती फुलविण्यासाठी सुखद आनंद देण्यासाठी पुरेसे असते; पण आपण त्यावर समाधानी नसतो. आपल्याला आणखी काही हवे असल्याची हाव असते. मग त्याच उन्हाचे चटके बसतात. आपण स्वतःलाच जखमी करून घेतो दुःखी करून घेतो. हे सूत्र सांगता येईल; मात्र या सगळ्याच कथा अनुभवाचे एकेक क्षण समृद्ध करणार्या आहेत हे नक्की."