Peshawe | पेशवे

Peshawe | पेशवे
या ग्रंथात पहिले पेशवे बालाजी भट ते शेवटच्या पेशव्यांपर्यंतच्या कालखंडाचा विस्तृत मागोवा घेतला आहे. पेशव्यांच्या कौटुंबिक घडामोडी, पेशव्यांचे नातेसंबंध, पेशव्यांच्या घरातील स्त्रिया यांची माहिती तपशिलानं दिली आहे. त्यामुळे पेशव्यांचं सामाजिक आचरण व त्या वेळचा सारा कालखंड लख्खपणे वाचकांच्या डोळ्यांसमोर उभा राहतो. कर्तबगार बाजीराव पेशवे आणि त्यांचा मस्तानीबरोबरचा कालखंड तर कळतोच, पण सातारच्या छत्रपती शाहूमहाराजांनी बाजीराव पेशव्यांना किती समजून घेतलं होतं हेही कळतं. या मोठ्या ग्रंथात पेशव्यांची कारकीर्द, त्यांची अखेर, त्यानंतर इंग्रजी सत्तेने त्यांच्या संपत्तीची केलेली लूट लक्षात येते. पेशवे घराण्याचा सारा इतिहास मांडताना पेशवे यांना अकारण मोठेपणाही दिलेला नाही. पेशव्यांच्या चुका आणि त्यांचे चुकीचे निर्णय याच्यावरही टीका करत परखडपणे त्यांची माहिती दिली आहे. १०४ वर्षांच्या पेशवाईची माहिती अतिशय विस्ताराने यात दिली आहे.