Peshwai : Maharashtrachya Itihasatil Ek Suvarnpan | पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान

Peshwai : Maharashtrachya Itihasatil Ek Suvarnpan | पेशवाई : महाराष्ट्राच्या इतिहासातील एक सुवर्णपान
पेशवाई म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातील जणू एक सुवर्णपानच. कोणेएके काळी जुलमी सत्ताधीशांच्या घोड्यांच्या टापा ऐकून भेदरणाऱ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची संजीवनी दिली. कोकणातील श्रीवर्धन येथून घाटावर आलेल्या बाळाजी विश्वनाथ भट आणि त्यांच्या वंशजांनी स्वराज्य कार्यात आपले आयुष्य झोकून दिले. पेशव्यांनी समर्थांच्या 'शक्ती-युक्ती जये ठाई' प्रमाणे पराक्रमाला बुद्धीची जोड देत 'सिंधुनदीच्या पैलतीरापासून कावेरीच्या दक्षिण तीरापर्यंत सारा मुलुख स्वराज्यात यावा' हे शिवछत्रपतींचे स्वप्न अठराव्या शतकात पूर्ण केले. पुढे मराठी फौजांनी अटक पेशावर ओलांडून सिंधू नदीच्या पैलतीरावर जाऊन शत्रूच्या उरात धडकी भरवली. "पेशव्यांनी शिंद्यांनी शिवप्रभूंचा जरीपटका दिल्लीच्या आसमंतात मोठ्या अभिमानाने फडकवला. हा काळ म्हणजेच मराठ्यांच्या पराक्रमाचा परमोच्च बिंदू. या साऱ्या पराक्रमाची यशोगाथा म्हणजेच पेशवाई....!"