Phule Ani Dagad | फुले आणि दगड

Phule Ani Dagad | फुले आणि दगड
आपलं आयुष्य म्हणजे सांकेतिक लिपीत लिहिलेलं एक पुस्तक असंच प्रत्येकजण मानीत असतो. एकाच्या अनुभवाचा दुसर्याला थांगही लागत नाही. आपण वर्षानुवर्ष एके ठिकाणी बसणारी - उठणारी माणसं, पण आपले बरे-वाईट अनुभव एकमेकांना मोकळेपणानं आपण कधी सांगतो का ? आपल्याच मनात झुरायचं, आपल्याच मनात गुदमरायचं, आपणच चाचपडत चाचपडत आयुष्याच्या मार्गावरून जायचं !.....आपण खर्याखुर्या अनुभवांची देवाणघेवाण करीतच नाही मुळी ! त्यामुळं मानवजातीची कितीही सुधारणा झाली असली, तरी प्रत्येक व्यक्ती अजून रानटी काळात असल्यासारखी आयुष्याला सुरुवात करते. पुढच्यांच्या ठेचांचा मागच्यांना उपयोग होतो खरा; पण तो केव्हा ? ठेचा कुठे लागतात, हे पुढले लोक सांगतील, तेव्हा. ठेचा लपवून, जणू काही झालंच नाही, म्हणून लोक चालू लागतात आणि समाज...