Pidhijat | पिढीजात

Pidhijat | पिढीजात
कादंबरीत साधारणत: दहा-बारा वर्षांपूर्वीचे राजकीय, सामाजिक आणि सहकारी चळवळीच्या वास्तवाचे चित्रण आले आहे. काळ बदलला, पिढी बदलली, सरकार बदलले तरी पिढ्यानपिढ्या चालू असलेली येथील भ्रष्ट व्यवस्था आणि गरीब शेतकर्याची पिळवणूक ही पिढीजात असल्यासारखी कायम तशीच चालू राहणार. एका गरीब शेतकरी कुटुंबातून आलेला नवनाथ हा राज्य सरकारच्या प्रशासन सेवेतील तरुण अधिकारी आहे. आपल्या हातून शेतकर्यांचे, कामगारांचे काही भले व्हावे म्हणून त्याने आपल्या गावाकडील एका शहरी भागात जिल्हा उपनिबंधकाची म्हणजे डीडीआरची जागा मागून घेतली आहे. त्याच्या दोन-तीन वर्षांच्या काळात अनेक छोट्या-मोठ्या प्रश्नांना तोंड देताना आलेले अनुभव, त्या अनुषंगाने भेटलेली शेकडो माणसे, अन्य अधिकार्यांकडून कळलेल्या अनेक घटना यांचे प्रभावी चित्रण हेच या कादंबरीचे मध्यवर्ती कथानक आहे. कादंबरीचे वैशिष्ट म्हणजे लेखकाने ठाशीवपणे चांगले विरुद्ध वाईट असे काळे-पांढरे चित्र इथे रंगवलेले नाही तर ही कादंबरी प्रत्येक माणसाच्या आणि घटनेच्या तळाशी जाऊन मूळ कारणांचा विचार करते.