Point of View |पॉईंट ऑफ व्ह्यू

Point of View |पॉईंट ऑफ व्ह्यू
स्त्री भूमिका! कधी आव्हानात्मक तर कधी रसरशीत. कधी आभाळापेक्षा मोठी तर कधी पुरुषाच्या सावलीत कोमेजून गेलेली. कधी अख्खा चित्रपट आपल्या समर्थ अभिनयानं तोलून धरणारी तर कधी शरीराच्या प्रदर्शनाशिवाय हेतुशून्य. कधी आपल्या प्रणयभावना मनाच्या खोलवर दरीत गाडून टाकणारी तर कधी दुसऱ्या स्त्रीवरही उन्मुक्तपणे स्वतःला उधळून देणारी. चित्रपटातल्या स्त्रीभूमिकांचे हे अनेकरंगी पदर प्रेक्षकांनाच नव्हे तर त्या भूमिका साकारण्याची ओढ असणाऱ्या कलाकारांना आणि त्या भूमिका पेश करू इच्छिणाऱ्या दिग्दर्शकांनाही भुरळ घालतात. अशाच निवडक चित्रपटांमधल्या स्त्रीभूमिकांचा हा 'पॉईंट ऑफ व्ह्यू!' आणि सोबत आहेत त्या त्या चित्रपटांच्या पडद्यामागच्या कहाणीचे 'रफ कट्स!'