Pracharya | प्राचार्य

Pracharya | प्राचार्य
पालकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी मेहनत घेणारे अनेक शिक्षक पूर्वीच्या काळात होते. अशाच एका शिक्षकाची गाथा प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी 'प्राचार्य' या पुस्तकातून रेखाटली आहे. जनसमुदायाचे मन आपल्या वाणीतून जिंकून घेणार्या प्राचार्य शिवाजीराव भोसले यांना अनेकांनी गुरुस्थानी मानले. एका शिष्याच्या नजरेला दिसलेला त्यांचा जीवनालेख जोशी यांनी 'प्राचार्य'मध्ये साकारला आहे. हे चरित्रात्मक लेखन वाचताना वाचकालाही जगण्याच्या नव्या दिशा सापडतात. शिवाजीराव भोसले यांची वक्तृत्वकला न अनुभवलेल्या आजच्या पिढीला, हे व्यक्तिमत्त्व कसे आहे याची कल्पना 'प्राचार्य'मधून येते.