Prachin Bharatiya Vidyapithe | प्राचीन भारतीय विद्यापीठे

Prachin Bharatiya Vidyapithe | प्राचीन भारतीय विद्यापीठे
प्राचीन भारतीय विद्यापीठे या पुस्तकातून वैदिक काळापासून ते बौध्द, जैन धर्माच्या शिक्षण पध्दतीच्या प्रसारापर्यंत ते पुढे मुसलमानी आक्रमकांमुळे उध्वस्त झालेल्या ज्ञानगंगेपर्यंत आढावा घेतलेला आहे. प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीचे वैशिष्ट्य म्हणजे ही ज्ञानगंगा केवळ भारतीय लोकांपर्यंत मर्यादीत न राहता अनेक पाश्चात्य विद्वान लोकांपर्यंत ती पोहोचली. निरिक्षण, परिक्षण, ज्ञानाचा व्यावहरिक उपयोग हे महत्त्वाचे वैशिष्ट्य प्राचीन भारतीय विद्यापीठांमध्ये होते. शिक्षण हे केवळ पैसे कमविण्यासाठीची बुध्दी आणि कौशल्याचा विकास करणे; या विचारांपलीकडे जाऊन चांगले चरित्र्य घडविणे, उच्च नीतीमुल्य प्रस्थापित करणे, परिवारासाठी आणि राष्ट्रासाठी जबाबदार नागरीक घडविणे; या विचारपध्दतीने भारतीय शिक्षणपध्दती घडविली गेली. अशावेळी या पुस्तकातून लेखिका श्वेता काजळे यांनी मांडलेला प्राचीन भारतीय शिक्षण पध्दतीचा गौरवान्वित इतिहास सर्वांना मार्गदर्शक आणि माहितीपूर्ण ठरेल.