Pran Pishacch | प्राण पिशाच्च

Pran Pishacch | प्राण पिशाच्च
भीती ही सुखद अनुभूती नव्हे. नंतर कधीतरी वर्णन करताना भीतिदायक अनुभव रम्य, रोमांचकारक वाटत असेल पण पुन्हा त्याच संकटातून जावं आणि तशाच भीतीचा अनुभव घ्यावा, असं कोणाही डोकं ताळ्यावर असणार्या माणसाला वाटणार नाही. असं असूनही आपण हॉरर फिल्म बघतो, भीतीचा अनुभव देणार्या गोष्टी वाचतो याचं रहस्य काय असाव? गोष्ट वाचताना किंवा सिनेमा बघताना आपल्याला जो भीतीचा अनुभव येतो तो ‘शुध्द’ असतो, त्यामागे खरोखरच काहीतरी संकट कोसळण्याचा संभव नसतो. अशी, कारण किंवा परिणाम यांच्याशी न जोडलेली भीती वाटून घेणे ही हौस आहे! तसला प्रसंग प्रत्यक्षात सामोरा आला तर त्याचा धक्का फार लागू नये याची ती पूर्वतयारी अजिबात नसते; प्रत्यक्ष प्रसंगात आपली बोबडीच वळणार असते! तर अशी ‘शुध्द’ भीती देणार्या कथा या संग्रहात आहेत.