Prasanganusar Bolave Kase | प्रसंगानुसार बोलावे कसे

Prasanganusar Bolave Kase | प्रसंगानुसार बोलावे कसे
रोजच्या बोलण्यातील अनेक प्रकारांपैकी २१ मुख्य प्रकार जसे शब्दोच्चार न करता बोलणे, देहबोलीतून बोलणे, विवक्षित ध्वनीतून बोलणे, अस्पष्ट बोलणे, एकतर्फी / दूतर्फी बोलणे, अनेक लोकांनी एकमेकांसोबत बोलणे, गोड/वाईट बोलणे, सकारात्मक / नकारात्मक बोलणे, नेभळट बोलणे, अतिशयोक्ती पूर्ण बोलणे, निरर्थक बोलणे आदी या ग्रंथात घेतलेले आहेत. या मुख्य प्रकारातील ३२५ पेक्षा जास्त मराठी, इंग्रजी, हिंदीतील उपप्रकाराप्रमाणे बोलताना, त्यात अंतर्भूत असणे आवश्यक असणाऱ्या गोष्टींची तपशीलवार माहिती, सोबत प्रत्येक उपप्रकाराचा असलेला प्रभाव वाढवण्यासाठी त्याच्या व्युत्पत्तीवरून मूळ अर्थ सांगितला आहे. अनेक सारख्या वाटणाऱ्या उपप्रकारातील फरक जसे सांगणे, म्हणणे, वदणे, संबोधणे, सुचवणे, कथन करणे, उद्गारणे, विधान करणे, वक्तव्य करणे, उपदेश करणे यांना जरी साधारणपणे समानार्थी समजले जात असले तरी, योग्य प्रभाव पाडण्यासाठी त्यात असलेला भरपूर फरक दाखवण्यात आला आहे.