Pratibha Sutra | प्रतिभासूत्र

Pratibha Sutra | प्रतिभासूत्र
मानवीय कल्पना ही आपल्याला शोध, नवनिर्मिती, नियोजन तसेच कुठल्याही गोष्टीतील जोखीम कमी करण्यासाठी सक्षम बनवते. असे असूनही व्यवसाय आणि व्यवस्थापन विश्वात ‘कल्पना’ या शब्दास मनाई आहे. जे लोक आपल्यासाठी काम करतात, आपण त्यांच्या कल्पनांना नियंत्रित करू पाहतो, कामापासून त्यांचं लक्ष विचलित होऊ नये याकरिता आपण त्यांच्या मेंदूवर अंकुश ठेवू पाहतो. तरीदेखील प्रत्येक व्यक्ती ही तिच्या काल्पनिक वास्तवातच जगत असते. "देवदत्त पट्टनायक यांचे प्रतिभा सूत्र हे पुस्तक कामाच्या ठिकाणी आवश्यक असणारी सर्जनशीलता कौशल्यांचे संगोपन आणि संघभावनेचे महत्त्व यांसांरख्या संकल्पनांना सविस्तर उलगडते. मालक आणि व्यवस्थापकांसाठी हे पुस्तक उपयुक्त असून त्यांना स्वतःबरोबरच आपल्या समूहाची प्रगती घडवून आणणारे सर्वसमावेशी नेतृत्वगुण आपल्यात रुजविण्याकरिता ते मदत करेल."