Pratyekachi Najar Tumchya Pakitavar Ahe!... | प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे! तुमची आहे का?

Pratyekachi Najar Tumchya Pakitavar Ahe!... | प्रत्येकाची नजर तुमच्या पाकिटावर आहे! तुमची आहे का?
पैसा हा आयुष्य यशस्वीपणे जगण्याचा एक महत्त्वाचा घटक आहे. पैसा मिळवण्यात आपण आपला प्रचंड वेळ घालवत असतो मात्र पैसा राखून ठेवणे आणि त्यात वाढ करणे यासाठी आपण अगदीच कमी वेळ देतो. तुमच्या आयुष्यात जेव्हा सुवर्णकाळ सुरू असतो तेव्हा तुमच्या अर्थव्यवस्थेला वेळ देण्याची मोठी गरज असते. तुम्ही वर्तमान काळात घेतलेले गुंतवणूकीचे निर्णय तुमच्या सर्वात जास्त गरजेच्यावेळी तुम्हाला आर्थिक सुरक्षितता देऊ शकतात. हे पुस्तक पैसा आणि गुंतवणूक यांच्याकडे पाहण्याची सोपी पद्धत तुम्हाला सांगते. तुमची आर्थिक उद्दिष्टे ठरवण्यासाठी आणि ती पूर्ण करण्यासाठी आवश्यक मार्ग व साधने दाखवण्यासाठी हे पुस्तक मार्गदर्शन करेल. तुम्ही कठोर परिश्रमाने मिळवलेल्या पैशाची संपूर्ण जबाबदारी घेणे शक्य होण्यासाठी आवश्यक असणारी सर्व रीतसर माहिती या पुस्तकात मिळते.