Pravas Eka Jiddicha | प्रवास एका जिद्दीचा

Pravas Eka Jiddicha | प्रवास एका जिद्दीचा
'प्रवास एका जिद्दीचा' मराठी साहित्यात आत्मकथने अनेक आहेत, मात्र त्यामध्ये मराठी उद्योजकांच्या चरित्र वा आत्मचरित्रांची संख्या फारच कमी आहेत. म्हणूनच मुरलीधर चयनी यांच्या या आत्मकथनाची निर्मिती ही मराठी साहित्यातील एक विशेष आहे. सांगली जिल्ह्यातील एक खेडेगावात भिक्षूकाच्या घरी जन्म घेतलेला मुरलीधर ध्येयासक्ती, महत्त्वाकांक्षा, अखंड परिश्रमाच्या बळावर देशात परदेशात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करतो आणि चयनीसाहेब म्हणून सर्वदूर नावलैकिक कमावतो, अनेक देशात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवतात आणि उद्योगक्षेत्रापलिकडे राजकारण, समाजकारण अर्थकारण, शेती, सहकार, शिक्षण आणि पत्रकारिता अशा अनेक क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करतात. या चौफेर कामगिरीचा अत्यंत प्रांजळ असा आलेख म्हणजे हे आत्मकथन. सुधीर कुलकर्णी यांनी या आत्मकथनाचे शब्दांकन केले आहे.