Pravasat Bhetaleli Manase | प्रवासात भेटलेली माणसे

Pravasat Bhetaleli Manase | प्रवासात भेटलेली माणसे
आयुष्य म्हणजेही एक दीर्घ प्रवासच आहे नाही का ? यातल्या तारुण्यकाळात आपण खूप भटकंती करतो. कधी गावात, कधी गावाबाहेर, कधी राज्यात कधी राज्याबाहेर, कधी देशाबाहेरही आपली भटकंती सुरूच असते. पुढे रिटायरमेंटनंतर तर हाती पैसाही असतो आणि वेळही. मग भटकंतीच्या नव्या वाटा सुरू होतात. गाडीनं, रेल्वेनं, विमानानं, बोटीनं ही भटकंती सुरूच राहते. सुदैवानं हेच सारं आयुष्य माझ्या वाट्याला आलं. खूप फिरलो. माणसं भेटली, वेगवेगळी स्थळं पाहिली व त्यावर लिहीत गेलो, 'भटकंती' मासिकात तब्बल ४-५ वर्षं लिहिलं त्यानंतर दैनिकांतून, दिवाळी अंकांतून लिहीत राहिलो. पर्यटनावरही सहा पुस्तकं मुंबई - पुण्यातल्या नामवंत प्रकाशकांनी प्रसिद्ध केली. काही व्यक्तींवर लिहिल्याशिवाय राहवलं नाही. त्यांचं मोठेपण, सच्चेपण मनात कायम रुंजी घालत राहतं. अशीच ही प्रवासात भेटलेली काही माणसं ---प्रा. सुहास द. बारटक्के.