Prema Tuza Rang Kasa? |प्रेमा तुझा रंग कसा?

Prema Tuza Rang Kasa? |प्रेमा तुझा रंग कसा?
पहिल्या उत्कट, आंधळ्या ओढीचा गुलाबी रंग, नंतरच्या रुसण्या-रागावण्याचा लाल रंग, पुढच्या कडू भांडणांचा काळा रंग- सारे प्रेमाचेच रंग! अनुराग, राग, विरह, कलह - या सार्या प्रेमाच्याच अटळ अवस्था ! प्रेम ही मोठी उदात्त भावना खरीच, पण तिला विवाहाचं व्यवहारी रूप आलं की अनेक विसंगती प्रगट होतात . उदात्तातील विसंगती - जे 'मोठं' त्याचं 'खोटेपण' म्हणजे विनोदी लेखणीच्या चेष्टांना भरपूर अवसर देणारं आंगणच !प्रा. वसंत कानेटकरांनी आपल्या पहिल्या विनोदी नाटकासाठी प्रेमाच्या बदलत्या रंगाचा विषय निवडण्यात अव्वल दर्जाची प्रतिभा व्यक्त केली आहे.स्त्री पुरुषांच्या आकर्षणाचं आणि प्रीतीचं नाटक जगाच्या रंगभूमीवर सतत चाललेलं आहे आणि चालणार आहे. ते सुरू केव्हा झालं आणि संपणार केव्हा हे सांगता येणार नाही, असा या नाटकाचा संदेश आहे. हा संदेश अशा काही मर्मद्य, रसिक, सहानुभुतीपूर्ण, खेळकर - क्वचित अवखळ शैलीनं रंगविला आहे की त्याची ही हास्यप्रधान नाट्यकृती सुरू केव्हा झाली आणि संपली केव्हा ते 'हशा आणि टाळ्यां'च्या जल्लोषात प्रेक्षकांना कळणार सुद्धा नाही!