Punha Tukaram | पुन्हा तुकाराम

Punha Tukaram | पुन्हा तुकाराम
स्वत: तुकोबांच्या काव्यजाणिवेवर प्रकाश टाकणे आणि त्यातून काव्यसमीक्षेची काही मूल्ये हाती लागतात का हे पाहणे, तसेच त्यांचा मराठी संवेदनस्वभावाशी आणि संस्कृतीशी ऐतिहासिक परिप्रेक्ष्यातून संबंध जोडून आवश्यक होते हा आहे. चित्र्यांनी नेमके हेच केलेले आहे. परंतु हे करताना त्यांना अपरिहार्यपणे मानदंड परिवर्तनाकडे जावे लागले आहे.…‘पुन्हा तुकाराम’मध्ये चित्र्यांनी तुकोबा मराठी वाङ्मयाच्या केंद्रस्थानी असा सिद्धान्त मानून त्यानुसार आता मराठीचे स्वतंत्र पण वैश्विक संदर्भात मांडण्याजोगे काव्यशास्त्र दृग्गोचर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुकोबा हा आपण चौफेर वाचलेल्या जागतिक कवितेतला एक अनन्य चमत्कार असून मराठी साहित्यबाजीने आणि कोत्या सांस्कृतिक बुद्धीने गमावलेला महाकवी आहे असे ते म्हणतात.