Purandare : Atharavya Shatakatil Ek Kartabgar Gharaane | पुरंदरे : अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे

Purandare : Atharavya Shatakatil Ek Kartabgar Gharaane | पुरंदरे : अठराव्या शतकातील एक कर्तबगार घराणे
सतराव्या शतकाच्या अखेरीस महाराष्ट्राच्या क्षितिजावर एक नवे घराणे उदयाला येऊ लागले होते. सासवडचे पुरंदरे ! राजाराम महाराजांच्या काळापासून स्वराज्याच्या सेवेत रुजू झालेल्या या घराण्याने अगदी पेशवाईच्या अखेरच्या क्षणापर्यंत स्वराज्याची मनोभावे सेवा केली. कोकणातून वरघाटी आलेल्या बाळाजी विश्वनाथांना प्रथम आसरा मिळाला तो पुरंदर्यांच्याच वाड्यात ! पुढे पेशव्यांनीही याचे उपकार म्हणून पुरंदर्यांना सातारा दरबारात मुतालकी आणि सरदारी दिली. प्राप्त होत असलेला पेशवाईचा मान मोठ्या मनाने श्रीवर्धनच्या भटांना देण्यापासून ते अगदी दुसरे बाजीराव माल्कमला शरण आले त्या क्षणापर्यंत या घराण्याच्या चार पिढ्यांनी पेशव्यांना सावलीसारखी साथ दिली. अशा या ऐतिहासिक घराण्यातील कर्तबगार पुरुषांची ही कामगिरी.