Purvasandhya | पूर्वसंध्या
Purvasandhya | पूर्वसंध्या
गोंदण, अनोळख, जन्मजान्हवी या कवितासंग्रहानंतर आता शान्ताबाईंचा `पूर्वसंध्या` हा नवीन कवितासंग्रह रसिकांसमोर येत आहे. मराठी कवितेच्या पूर्वपरंपरेशी असलेले आपले नाते जपत असतानाच शान्ताबाईंनी नव्या कवितेशीही सुजाण रसिकपणाने अनुबंध जोडला आणि तिच्यातली स्वतःला भावलेली वैशिष्टे आत्मसात केली. भाषेची नवी वळणे, आशयसंपृक्तता, वेगळी प्रतिमासृष्टी हे सारे त्यांच्या कवितेने स्वतःत मुरवून घेतले, पण हे जुने-नवे काव्यसंस्कार घेतानाही त्यांची कविता ही पुन्हा त्यांचीच राहिली. साधी, सरळ, सहजपणे आपले मनोगत व्यक्त करणारी आणि रसिकांशी मोकळ्या जिव्हाळ्याने बोलणारी.