Pustak Vachnare Phulpakharu | पुस्तक वाचणारं फ़ुलपाखरु

Pustak Vachnare Phulpakharu | पुस्तक वाचणारं फ़ुलपाखरु
अन्वय एकटाच निघाला होता शाळेत आणि त्याला रस्त्यात भेटलं फुलपाखरू. अन्वयच्या पाठोपाठ मग शाळेत गेलं फुलपाखरू आणि एकटं नाही बरं का! त्याच्याबरोबर अख्खी बागच गेली शाळेत. मग फुलपाखराचे पंख घेतले अन्वयने आणि अन्वयचे पाय घेतले फुलपाखराने. फुलपाखराने मग शाळेत खेळलं क्रिकेट, स्टाफरूममध्येही विहरून आलं ते. गाण्याच्या तासाला जाऊन व्हायोलीनही वाजवलं त्याने. अन्वयही मधल्या सुट्टीत उडतउडत घरी गेला आणि आईला भेटून आला. शाळेत गेल्यावर मग त्याने केली शोधाशोध. फुलपाखरू त्याला भेटलं लायब्ररीत पुस्तक वाचताना. फुलपाखराने मग अन्वयला सांगितली एक कल्पना, अन्वयने तिला दिला दुजोरा. अन्वय आणि फुलपाखराची ही गोष्ट आहे छान! सुंदर सुंदर चित्रांची तिला आहे साथ!