Rahasya Prachin Natarajache | रहस्य प्राचीन नटराजाचे

Rahasya Prachin Natarajache | रहस्य प्राचीन नटराजाचे
अपंग असलेला टॉम पुरातत्त्व खात्याच्या एका लायब्ररीत मोठ्या पदावर काम करत असतो. नटराजाची एक चौलकालीन मूर्ती लिलावात विकत घेण्याची संधी टॉमला प्राप्त होणार असते; पण त्या मूर्तीच्या खरेपणाविषयी टॉमला शंका असते. म्हणून त्या मूर्तीचा खरे-खोटेपणा तपासण्यासाठी तो त्याच्या भावाला, जोशला भरीला घालतो आणि इथूनच एका नाट्याला सुरुवात होते. त्या शोधासाठी इंटरनेट हॅकर असलेला जोश भारतात येतो. इथे चेन्नईत त्याची भेट विद्याशी होते. विद्या आणि तो त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य शोधायला लागतात. पुरातन वस्तू विकणाऱ्या एका छोट्या स्टोअरपासून सुरू झालेली ही शोधयात्रा एका मोठ्या स्टोअरपाशी येते, या स्टोअरच्या मालकाचं शंकास्पद वागणं गूढता निर्माण करतं. त्यातच विद्यावर पाळत ठेवली जात असते. लंडनमधून टॉम त्यांना आवश्यक ती माहिती पुरवत असतो. विद्याचे वडीलही त्यांना मदत करत असतात. ही शोधयात्रा एका छोट्या गावातील मूर्तिकारापाशी येऊन थांबते. या मूर्तिकाराद्वारे उलगडतं का त्या नटराजाच्या मूर्तीचं रहस्य?