Rahasyamay Peru | रहस्यमय पेरू

Dr. Sandeep Shrotri | डॉ. संदीप श्रोत्री
Regular price Rs. 270.00
Sale price Rs. 270.00 Regular price Rs. 300.00
Unit price
Rahasyamay Peru ( रहस्यमय पेरू ) by Dr. Sandeep Shrotri ( डॉ. संदीप श्रोत्री )

Rahasyamay Peru | रहस्यमय पेरू

About The Book
Book Details
Book Reviews

पेरू देश म्हणजे गूढ आणि रहस्यमय ठिकाणांची खाण. स्पॅनिशांनी आक्रमण करून या देशावर पाच शतके राज्य केले. पाषाणांच्या इमारतीवर अवाढव्य राजवाडे बांधले. आजही पाया खोदला, तर लाखो सांगाडे मिळतात. लिमा शहरामध्ये फिरताना पावलोपावली जुन्या काळाच्या खुणा आढळतात. हा देश पाहताना आपल्या मनात अनेक प्रश्नांचे मोहोळ उठते. परकास बेटावरील अवाढव्य त्रिशूल थेट रामायणाशी नाते सांगतो का ? विज्ञान, तंत्रज्ञान आणि तर्कबुद्धी यांना अद्याप ज्यांचे कोडे पूर्णपणे उलगडता आलेले नाही, त्या नाझ्काच्या रेखाकृती मानवनिर्मित आहेत की परग्रहवासीय एलियननी साकारलेल्या ? विस्तीर्ण पठारावर विसावलेल्या या प्राणी-पक्षी-मानवाच्या रेखाकृती म्हणजे जणू नोहाची नौकाच ! त्यांचे संपूर्ण दर्शन आधुनिक काळात मानवाला झाले, तेच मुळी विमानातून ! इतिहासाच्या पोटातील अशी अनेक गूढ रहस्ये आपल्या भूमीवर वागवणाऱ्या देशाची वेधक सफर.

ISBN: 978-8-19-517084-5
Author Name: Dr. Sandeep Shrotri | डॉ. संदीप श्रोत्री
Publisher: Rajhans Prakashan Pvt. Ltd. | राजहंस प्रकाशन प्रा.लि.
Translator: -
Binding: Paperback
Pages: 156
Language: Marathi | मराठी
Edition: Latest

Recently Viewed Products