Rainmaker Ani Etar Ekankika: Sangit Afu |रेनमेकर आणि इतर एकांकिका: संगीत अफू

Rainmaker Ani Etar Ekankika: Sangit Afu |रेनमेकर आणि इतर एकांकिका: संगीत अफू
( ३ एकांकिकांचा संग्रह) : बयो, पोरीचा जल्म आपला... आणि पोरीचा जल्म म्हणजे पाकुळीचा जल्म. समोर चुलीची आग असो कि समई जोत, आपण जीव झोकून देचा बयो, पोरीचा जल्म आपला... "आपले खेळ हे असेच.... फरशीच्या तुकड्यांचे डोलारे उभे करून लगोरीघर उधळायचे खेळ पोरांचे. तोच फरशीचा तुकडा फेकचा आणि घर जिंकाचे खेळ पोरींचे. बयो पोरीचा जल्म आपला.... घराला असतो कोयंडा आणि कोयंडा हा गडी असतो. अन आपण पोरी घराच्या भिंती आणि कोयंड्याच्या कडी असतो. बयो पोरीचा जल्म आपल्या नुसत्या फुंकरीण चुलीत ज्वाळ आली पायजे. आपल्या डोळ्यातल्या आसवाची पण बयो दाळ झाली पायजे. बाप्याच्या डोक्यातला राग म्हणजे वादळजंगल अन घुबरं काळीज " "पोरीचा राग म्हणजे चाफा पैंजण भुकंप नायतर कडाड वीज अन बयो जंगलातली वीज म्हणजे आग आणि समोर चुलीची आग असो कि समईची जोत. आपण जीव झाकून देचा " "कसंय बयो पोरीचा जल्म आपला... पोरीचा जल्म. "