Raja Kabutar Ani Vruddha Va Itar Goshti | राजा कबुतर आणि वृद्ध व इतर गोष्टी

Raja Kabutar Ani Vruddha Va Itar Goshti | राजा कबुतर आणि वृद्ध व इतर गोष्टी
नंदी होता दु:खी त्याला मिळाली संधी शैलेश, प्रणव आणि अनुजाने पाडला पाऊस खोटा...त्यामुळे त्यांचाच झाला तोटा... श्यामलीने बाग केली शिल्पाच्या हवाली...शिल्पाच्या दुर्लक्षामुळे बाग कोमेजली...उमा होती शहाणी...तिने आजीला वाचायला शिकवलं इंग्रजी...कुत्रा आणि लांडगा होते बरोबर...पण कुत्र्याने इमानदारीच्या आश्वासनाने मागितलं घर...प्रसन्ना नवीन घरात राहायला गेली; पण का नव्हतं आवडलं तिला ते घर?... एकदा पाऊलवाट होती हिरमुसली...राजरस्त्याने तिची समजूत घातली...शिल्पाला दुकानदाराकडून चुकून आली जास्तीची नोट...ती केली का तिने परत?... पापकाला त्याच्या नावाची लाज वाटत होती...मग त्याच्या गुरूंनी काय सांगितलं त्याला?... राजाने वालू लोहाराला लोहाचा चालताबोलता माणूस करायला सांगितलं...केला का मग त्याने लोहाचा माणूस?...चतुराचं पिल्लू झालं होतं नाराज...कशी दूर झाली त्याची नाराजी?...साप हातात घेऊन सापांची माहिती द्यायला घाबरत होती अक्षदा...गेली का तिची भीती?... अनुष्का गेली कॅम्पला...पण तिच्या मैत्रिणी का रागावल्या तिच्यावर?...धर्मा सतत वाचायचा पुस्तकं कसा झाला तो धर्मानंद?... गोष्टी छोट्या छोट्या छान...गोष्टींच्या शेवटी संकल्प नीतिमान...चित्रं आहेत सुंदर, देखणी...कुमारांसाठी अनोखी पर्वणी