Ramalkhuna | रमलखुणा

Ramalkhuna | रमलखुणा
‘रमलखुणा’ या पुस्तकात ‘प्रवासी’ आणि ‘इस्किलर’ या दोन दीर्घ कथा आहेत. वाचकांना गुंतवून टाकणाऱ्या आणि त्याची उत्कंठा वाढवणाऱ्या जीएंच्या विशिष्ट चित्रमय शैलीमध्ये त्या लिहिल्या आहेत. दोन्ही कथा स्वतंत्रपणे लिहिलेल्या असल्या तरी दोन्ही दीर्घकथांमध्ये अनंताच्या दिशाहीन प्रवासाला निघालेला प्रवासी आहे. हा प्रवासी कधीकधी जीवनाच्या अर्थाच्या शोधात, कधी वासनेसाठी, तर कधी अज्ञात कारणास्तव प्रवास करत राहतो. या प्रवासात नवनवीन प्रकारचे शहाणपण शिकत राहतो. ‘प्रवासी’ मृत्यूचा संदेश देते, जो अपरिहार्य आहे, इतर काहीही कायमस्वरूपी नाही. ‘इस्किलार’ कथेच्या अखेरीस प्रवाशाला जाणवते की, माणसाच्या जीवनात नियतीचे स्थान महत्त्वाचे आहे. नियतीपासून दूर पळण्याचा प्रयत्न केला तरी अखेरीस विधिलिखित टळत नाही.