Ranbhul | रानभूल
Ranbhul | रानभूल
सुन्न करणारे क्रौर्य ह्या कादंबरीतल्या-भारतातली संस्थानं खालसा होण्याअगोदरच्या काळातल्या- कथानकात मुस्लीम संस्थानिक आणि हिंदू जनता ह्यांच्यातला संघर्ष नेमकेपणानं मांडला आहे. गरीब जनतेची पिळवणूक, त्यांच्यावर जुलुम-जबरदस्ती, त्यांच्या कत्तली आणि जाळपोळ करणारे अधिकारी व गुंड ह्यांच्याविरुद्ध कादंबरीचा नायक आणि त्याचे मित्र कृतिसमिती स्थापन करतात. लोकांना दिलासा देण्याचं काम करणार्या ह्या समितीच्या लोकांना समाजातल्या वरिष्ठ अभिजनांनीही विरोध केल्यामुळं विनाश घडून येतो. त्यांत नायक आणि त्याच्या कुटुंबियांचा बळी जातो. हे सगळं कथानक लेखकानं नेमकेपणानं मांडलं आहे, त्यामुळं ते परिणामकारक झालं आहे.